Friday, April 18, 2008

मीच वेडा...

Friday, April 18, 2008

'अरे खुशमन,जरा बाजुच्‍या गल्‍लीत जाऊन xerox करून आण बरं..'शेटजींची हाक ऐकू आली, नि मी भानावर आलो.पटकन्‌ कागद घेऊन,मी copy काढायला गेलो.पायर्‍या चढतानाच समोर मोरपिशी पदर सळसळला.निळ्‍याशार बांगड्‍यांनी भरलेल्‍या गोंडस हाताने, काचेचं दार ओढून घेत एक स्‍त्री अवखळपणे पायर्‍या उतरून गेली,नि खाली उभ्‍याअसलेल्‍या silver honda city मध्‍ये बसून,सर्रकन्‌ निघून गेली..गाडी स्‍वत: चालवत !! मी चकित होऊन बघतच राहिलो. डौलात निघताना,तिने किंचित तिरप्‍या नजरेने माझ्‍याकडे पाहिले का? खोडकर हसू ओठांवर येऊन, तिने ते दडवले का? की, मला भास झाला? नाही..भास कसा असेल? हो.. हसलीच ती ! ती, तीच होती !!हां..,त्‍याचे असे झाले..मी जिथे watchman ची नोकरी करतो,ते काबरा emporium आणि axis bank शेजारी शेजारीआहेत.चौक ओलांडताच, डाव्‍या हाताला या दोन्‍ही इमारती आहेत, त्‍यामुळे हिरवा सिग्‍नल मिळालेली वाहने या रस्‍त्‍यावरून वेगाने पुढे जातात. आमच्‍या इमारती समोर जरा मोकळी जागा असल्‍याने, तिथे गाडी ठेवायचा मोह प्रत्‍येकालाचहोतो. खरं तर ही जागा आमच्‍या ग्राहकांसाठी आहे.पण bank मध्‍ये येणारे व आसपास कामे असणारे वाहनचालक सारखे इथे गाड्‍या लावतातच; त्‍यामुळे मला फार सतर्क रहावे लागते. शक्‍यतो कुणाला मी गाडी ठेवू देत नाही; पण ही गाडीसर्रकन्‌ येऊन थांबली, नि चालवणारे साहेब झटकन्‌ उतरून, झपाझप bank मध्‍ये गेले. बाजूला या बाईसाहेब बसलेल्‍या!म्‍हणजे, जर गरज पडती, तर त्‍या गाडी काढू शकल्‍या असत्‍या..मी म्‍हंटलं, ठीक आहे,पाच मिनिटांनी बघू या..पण, साहेब काही आले नाहीत. बाईसाहेब मस्‍त एसीची हवा खात, गाणी ऐकत बसल्‍या होत्‍या. मी वैतागून त्‍यांना गाडीकाढायची खूण केली, तर त्‍यांनी driving seat कडे इशारा केला.रस्‍त्‍यावर दोन्‍ही बाजूंनी येणार्‍या जाणार्‍या गाड्‍या मधूनच या गाडीमुळे अडत होत्‍या, नि जोरजोरात horn वाजवत होत्‍या; अशीच दहा-बारा मिनिटे गेली. मध्‍ये एकदा शेटजीही गाडीकाढायसाठी मला ओरडले. परत एकदा मी बाईंशी बोलायला गाडीजवळ गेलो. म्‍हंटलं,'काय हो बाईंजी,किती वेळ झाला?traffic अडतंय ना..' त्‍या आपल्‍या काचेआड..परत मी,'पण इथे लावलीच का? मी तेव्‍हांच सांगत होतो ना..'मानेनेहो,हो, असे काहीसे सांगत त्‍यांनी सेल डायल केला..पण तो गाडीतच वाजला बहुतेक.. मी आपला बंद काचेवर बडबडकरत होतो.. मग मी काचेवर टकटक केलं; काच जराशी खाली सरकली.हातभर निळ्‍याशार बांगड्‍या खुळखुळ वाजवतत्‍या गोंडस हाताने खुणावले, व मोरपिशी पदरामागून आवाज आला,'हमें गाडी चलाना नहीं आता जी...."अरे रामा, आता करू तरी काय मी?? वैतागून मग एका लेनच्‍या गाड्‍या थांबवून, मी गाड्‍यांना पास दिला व रस्‍तामोकळा केला. तेवढ्‍यात कुठूनसे ते साहेब येऊन, ती गाडीही भुर्रकन्‌ निघून गेली. बघा ! झालं? मला काही बोलताहीआलं नाही त्‍यांना.. आणि म्‍हणजे....त्‍या बाईसाहेबांनी अगदी येड्‍यात काढलं की हो मला...!!मी अगदी किंकर्तव्‍यविमूढ असाच झालो होतो...आणि या madam नी आत्ता मला ओळखलं होतं,नक्‍कीच !!त्‍याशिवाय का ते खोडकर हसू डोकावलं होतं??......

Sunday, March 23, 2008

लघुतम कथा...

Sunday, March 23, 2008


शेजारच्‍या नानी सांगत होत्‍या, त्‍यांची आईबापावेगळी नात आज उदास आहे म्‍हणून; तिच्‍या परवाच येणार्‍या वाढदिवसासाठी घेतलेला frockफारच साधा, प्‍लेन आहे, तिला छान दिसणार नाही,म्‍हणून; म्‍हंटलं, माझ्‍याकडे पाठवा तिला..ती frock घेऊन आली. रंग छान गुलाबी होता. तिला म्‍हंटलं, माझ्‍याकडची सोनेरी लेस छान, नागमोडी लावून देते. तर, तिला ते फारच आवडले. पण लौकर देशील ना? आता मला frock छान दिसेल,म्‍हणाली.. तिला काही खरेदीसाठी गावात जायचेहोते. मी बरोबर येऊ का, विचारलं, तर ड्रायव्‍हर रामचाचांना घेऊन जाते, म्‍हणाली. मी तिला थोडेसं प्रेम आणि विश्‍वास दिला, तर छान खुलून आली होती......काल म्‍हणे, बिग बझारमध्‍ये, तिला चिडवणार्‍या नि चोरी करणार्‍या नऊ जणांना तिने पकडून दिले होते..आत्‍मविश्‍वास वाढताच, तिच्‍याजवळच्‍या आहे त्‍याच शक्‍तीने, केवढी मोठी कामगिरी बजावली होती....

Sunday, January 27, 2008

असे आमचे लोकनेते..

कालपासून डोके जरा भिरभिरलेलेच होते. शौरी आणि अमलचे बोरनहाण करायचे, तर तारखाच जमत नव्‍हत्‍या. त्‍यात दोन्‍ही मुलांच्‍या तब्‍येतींची कुरकुर.
ते तिळवण मुलांनी enjoy तर करायला हवे ना!
फोनाफोनी फार झाली, अन्‌ तारीख निघाली नाहीच. निघताना पुन: ह्‍यांची-माझी कटकट झालीच!
ते घरी राहून आवराआवरीची बरीच कामे करणार होते. कधी नव्‍हे तो मी free hand दिल्‍यावर,
त्‍यांना अगदी घाई झाली होती. कधी एकदा ही जात्‍ये, असे झाले होते. पण मला तसे दिसू तरी द्‌यायचे नव्‍हते ना! मला परत nobody loves me चे feeling आले..
झाले..लागले डोळे वाहायला! मग धडाधडा तयारी केली, नि निघाले एकदाची! भरीला बेगम अख्‍तरची गझल लावली नि शांतपणे रडत राहिले..
काल दोघांनी बेलापूरला जायचे ठरवले होते,पण मला एकटीलाच निघावे लागले.शनिवारी मोहरमची सुटी
आल्‍याने बँकेची कामे रखडली, सोमवारवर गेली.ती करण्‍यासाठी ह्‍यांना घरी राहणे भाग होते.
सगळं आवरताना निघायला बारा वाजले.तशी घाईही नव्‍हती, कारण मिनू चार वाजताच घरी येणार होती.
आता रस्‍ता जरा बरा झालाय नि वाहनांची गर्दीही आज कमी वाटली. जरा वेळाने लक्षात आले की, S.T.च्‍या बसेस जरा जास्‍तच जातायत, मुंबईच्‍या दिशेने.. मी काही फार वेगात नव्‍हते,
त्‍यामुळे बर्‍याच बसेस रोरावत मला overtake करत होत्‍या.
तासाभरात डोळेही कोरडे झाले,नि डोकेही जागेवर आले...तर, त्‍या सगळ्‍या बसेस भारतीय जनता पार्टीने hire केल्‍या होत्‍या.साठ तरी असतील. शिवाजी पार्कवर नरेन्‍द्र मोदींची जाहीत सभा होती,त्‍यासाठी मंडळी
निघाली होती. बसेस,खाजगी jeeps , cars चा ताफा निघाला होता, कुणाच्‍या खर्चाने,कोण जाणे!
एव्‍हांना दीड वाजत आला होता.हळूहळू रस्‍त्‍यात काही ठिकाणी थर्माकोलचे पेले, अर्धवट खाल्‍लेले lunch-packs यांचा सडा दिसू लागला. थांबलेल्‍या बसेस, भोवतीने त्‍या राजकारणी लोकांचा गराडा,
अन्‍नाची नासाडी.... सगळेच मन विषण्‍ण करणारे होते..
आता रागही यायला लागला. हा रस्‍ता आता four-lane होऊ घातलाय, तो असाच घाण ठेवणार आहोत का आपण?या नेत्‍यांची आणि पक्ष-कार्यकर्त्‍यांची हीच का जबाबदारीची जाणीव? ह्‍या लोकांना आपण निवडून देतो, ते समाजाची सेवा करायसाठी, की माज करण्‍यासाठी?
अन्‍न पिकवणारा शेतकरी आज आत्‍महत्‍यांच्‍या भोवर्‍यात सापडलाय, उध्‍वस्‍त होतोय,
आणि आपण अन्‍नाची अशी नासाडी करतोय? मग, एकेक आठवत राहिले...
श्रावण महिन्‍यात, ब्रह्‍मगिरीच्‍या फेरीनंतर मार्गभर पसरलेले चहादुधाचे पेले,खिचडीचा सडा.....
नवरात्रात, कालिकेच्‍या जत्रेनंतर सगळीकडे पसरलेला कचरा....
अनंतचतुर्दशी नंतर गणेशमूर्तींच्‍या अवशेषांनी विद्रूप बनलेले किनारे....
६डिसेंबरच्‍या मेळाव्‍यानंतर घाणेघाण झालेले शिवाजी पार्क....
कुंभमेळ्‍यानंतरचा गोदाघाट....
किती नि काय काय म्‍हणूनआठवायचे? नि येऊन-जाऊन घाणच आठवायची ना?
या ताफ्‍यातली ४० नंबरची बस बराच वेळ माझ्‍या पुढेच होती.मला अंतर राखावे लागत होते, नाही तर पिचकार्‍या screen वर आल्‍या असत्‍या ना!!
एका बसवर विजय सानेंच्‍या नावाचा फलक होता. हे आमचे इंदिरानगरवासी..पण ती बसही कचर्‍याने वेढलेलीच!मनाशी ठरवलं की यावर लिहायचेच.....photo ही घ्‍यायचे होते, पण एकटी होते, म्‍हणून गाडीतून नाही उतरले..
परवा, द्‍वारका सर्कलला सहा press-reporters ना, त्‍यांच्‍या तवेरा गाडीसकट kidnap करुन झोडले ना.......