Tuesday, May 1, 2007

युध्‍दाचा प्रसंग..

रविवार सकाळपासून मौनातच गेला..आई,हे आणि मिनल यांची जेवणे आधी केली,नि मग मी आणि मिनू बसलो.. आम्‍ही जेवत असतानाच, हे खाली आले..हातात माझी छोटी jeans ची शबनम होती.....मला म्‍हणाले,जाउन येतो जरा..
आता,कुठे ते कसं विचारायचं?.भर उन्‍हाची वेळ! एकदा वाटलं,मसाजला गेले असतील,पण इतकं जेवल्‍याजेवल्‍या? आणि विचारल्‍यावर आणखीन्‌ तडकले म्‍हणजे?.....ok म्‍हंटलं,आणि मुकाट्‍याने जेवत राहिले.......
सोनलचं झाल्‍यावर मात्र पटकन्‌ ओटा आवरला, आणि त्‍यांना फोन केला. कुठे आहेत ते विचारायला....
गंगेवर आहे असे म्‍हणाले.पटकन्‌ गाडी घेउन घाटावर निघाले.....club ची membership असताना,यांना घाटाच्‍या घाणेरड्‍या पाण्‍यात कशाला जायला हवंय? पण हे बोलायचं कुणी?
सगळा घाट पालथा घातला,पण हे कुठे दिसेनात..खरंच इथे आलोय असंच सांगितलं ना? मला काही सुचेना..
परत त्‍यांना फोन केला, तर परत निघालोय, म्‍हणाले............काय रे देवा!! त्‍यांना थांबायला सांगितलं आणि परत निघाले..
मुंबई नाक्‍याच्‍या अलिकडे, रस्‍त्‍याकडेला ते थांबले होते..त्‍यांच्‍या गाडीजवळ गाडी पार्क करुन,त्‍यांच्‍या गाडीत जाउन, जरा वेळ बोलत बसले..समजूत काढली..म्‍हंटलं,का असं वागता? माझी किती ओढाताण होतेय, बघता ना?
ok, चल म्‍हणाले..मग घरी आलो.....ते वर आपल्‍या खोलीत, नि मी आईजवळ, झोपून गेलो... ..
आईने विचारलेच, कुठे गेली होतीस ग? ....म्‍हंटलं, काही नाही ग,.......जरा शुभाकडे जाउन आले....................

2 comments:

Sandeep Godbole said...

Don't be so scared - just tell him "You are jerk!"

sushama said...

Cant say like that..he is not so..dunno,something is very wrong with him..I must find it out,and mend it...