परवा रात्रीच्या गडबडीत सारेगमप नीटसं बघताच आल नाही..पण सुधीर मोघेंनी गायलेलं गीत मात्र मनात अगदी ठसलं..स्वामी मालिकेत त्यांनी ते background ला वापरलं होतं..सगळं गीत काही लक्षात राहिलं नाही, .. पण मारवा रागातली सुरावट काही केल्या डोक्यातून जाइना.. आणि त्या दोन ओळी तर लगेचच संपून जायच्या....मग जरा चार ओळी रचल्या, आणि गुणगुणत राहिले.....
तुझे मन माझे झाले,माझे मन तुझे झाले..
तुझा प्राण माझा प्राण,उरले ना वेगळाले..
काटा तुझ्या पावलात,आसू माझ्या ग डोळ्यात..
सल तुझ्या काळजात,मन माझं खंतावतं..
तुझ्या हासण्याची रेष,माझ्या जीवनी प्रकाश..
तुझ्या मनात बकूळ,माझ्या मनीं दरवळ.....
दोन दिवस तेच गाणं..तेच वेड..सकाळी चहा करतानाही तेच सूर..शेवटी मिनू वरून ओरडली, काय गं !!सकाळी सकाळी मारवा आळवतेयस?? जरा दुसरं काही गा बघू.........
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
हं... हे गाणं ऐकून खूप वर्ष झाली, पण हा मारवा आहे असं वाटत नाही. माझ्या एका मैत्रिणीला फोन करून विचारलं तिच्या म्हणण्याप्रमाणे ही हा मारवा वाटत नाही. म, ध नि जुळतायेत, पण कोमल रे मात्रं सापडत नाही?
Hi,tula maheet aahe ka he gana?mala tyache shabda deu shakshil ka,pls?
Post a Comment