Saturday, May 5, 2007

क्षणात....

आज बारीकसारीक खरेदीची यादी केली..मुद्‍दामच ह्‍यांना बरोबर घेऊन बाहेर पडले..एकतर मेनरोडवर एकटीने जायला कंटाळा येतो..आणि दुसरे म्‍हणजे, ह्‍यांच्‍याशी जरा गप्‍पाही मारता येतात..आजकाल गावात गेल्‍यावर parking चा फारच problem येतो, हयांना चिडचिड करायला एक सार्वकालिक निमित्त! हो, पण आज मात्र जागा लगेच मिळाली. एक धोतर घ्‍यायचं होतं यायांसाठी, आणि भाऊसाहेबांसाठी कुरता, शिवाय थोडी औषधेही...आधी पोद्‍दार store मध्‍ये गेलो. इथे बरीच नोकरमाणसे कामाशिवाय उभी असतात..
कुरता हवाय म्‍हंटल्‍यावर तीन माणसे एकावेळी विचारायला लागली.काय,कसा, कुणासाठी,लखनवी का?..ह्‍यांना त्रास व्‍हायला सुरवात झाली.मग मी म्‍हंटलं,अहो, दाखवा तरी आधी! मग एक खोका पुढे आला..त्‍यांना chinese collar.....हे म्‍हणाले, अशी नको,साधा गळा....ते म्‍हणे, तसा नाही येत...
अरे,नाही कसा? मी आधी घेतल्‍येत ना तसे!..तरी ते म्‍हणे,नाही येत तसे..हे भडकले..अरे,येत नाही,असं नका सांगू, तुमच्‍याकडे नाहीयेत,असं म्‍हणा.....मग झाला वाद सुरू!
म्‍हंटलं,चला हो,जाऊ द्‍या,काय या बावळट लोकांच्‍या तोंडी लागता.त्‍यांना काही training नसतं.....
मग मलाच customer satisfaction वर एक भाषण ऐकावं लागलं (पाठच होतं मला ते)
शेजारच्‍या दुकानातही कुरता नव्‍हताच..मग श्रीराम मेडिकलमध्‍ये गेलो.तिथे कुलकर्णींशी बोलून,हसून मूड छान सुधारला. धोतरही मनासारखं मिळालं.भराभर चालत गाडीकडे निघालो.रस पिऊन जरा आणखी ताजेतवाने झालो,नि मजेत गप्‍पा मारत घरी आलो.
मिनूचं जेवण झालं होतं, आई मात्र थांबली होती..
जेवणही अगदीच flat होतं म्‍हणे..............
TVही अगदीच नीरस बातम्‍या देत होता....encounter,गुजराथ सरकारचं धोरण,CBI...
मग चिडून त्‍याच्‍यावर तोंडसुख घेऊन झालं..मी नि आई गप्‍पच!!..
शेवटी कंटाळून तेही गप्‍प झाले..हात धुऊन वरती गेले......
मग माझं आवरल्‍यावर वर गेले..जरा जवळ घेऊन थोपटल्‍यावर स्‍वारी शांत..क्षणात झोपही लागली..
काय बाई हा स्‍वभाव.. .... !!
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात पिवळे ऊन पडे!!

2 comments:

A woman from India said...

Has he always been that temperamental? If he wasn't like this before, you might want to get his thyoriod level checked. I am not a doctor, but it happened to my friend's mom. Turned out that her thyoriod was hyper which was making her irritable. Just an idea.

sushama said...

Hi Sangeeta,aadhicha blog wachla asshil tar,bagh,retirement ghetlya nantar,tyanche wagne ase hot gele aahe..I think,the root cause is not accepting the fact..