परवा गंगेच्या काठावर फिरत असताना,एका खाणावळवाल्याचा बोर्ड वाचला, १००/५००/१००० माणसांना अन्नदान येथे करता येईल.राईसप्लेट,पुरी-भाजी,लाडू इ.चे दरपत्रकही लावले होते. मनाला एकदम बरे वाटले की,आता पितृपक्ष, वाढदिवस इ.च्या निमित्ताने लोकांना जेवू घालता येईल. मग त्या माणसाला भेटून,चौकशी करून, advance ही देऊनआलो,आजचं जेवण नक्की करून...आज बरोब्बर साडेबाराला तिथे पोचलो.खाणावळीसमोरच गाडी ठेवली व आत गेलो.स्वच्छ स्वयंपाकघर,स्वच्छ भांडी,स्वच्छ टेबलं..त्याने बसायला सांगितले तिथे बसलो.३/४ जणांची लगबग चालली होती.त्यांनी हळूहळू ४/५ मोठाली भांडी टेबलावर आणून ठेवली.एका मोठ्या पातेल्यामध्ये बटाट्याचा रस्सा, ३ मोठी भांडी भरून पुर्या व एका पिशवीत ३/४ किलो बुंदीचे लाडू; भांडी, अन्न अगदी स्वच्छ होते. बाहेर हळूहळू वर्दळ वाढू लागली होती. लहान-मोठी मुले, उघडी-वाघडी, झिपरी मुले आत डोकावून भांड्यांकडे नि आमच्याकडे बघत होती.मुली ढगळ कपडे व झिपर्या सावरत भोवती फिरत होत्या.नदीवरही स्नाने करणार्यांची, कपडे धुणार्या लोकांची लगबग सुरू होती.या नाशिकच्या गोदाघाटावर नेहमीच फिरस्ते,प्रवासी,भिकारी यांची गर्दी असते.क्रियाकर्मे, अस्थि-विसर्जन करणारी माणसे बोडक्या डोक्यांनी फिरत असतात, स्नाने करत असतात. बाया तशाच उघड्यावर आंघोळी, कपडे आटपत असतात.त्यांच्यातल्याही काही टेबलाकडे लक्ष ठेवून होत्या.मोहमाया सोडलेले so-called भगवे साधूही कोंडाळे करून इकडेच बघत होते. हातात कमंडलू, कडीचे डबे होते. खाणावळवाल्यांची व्यवस्था झाल्यावर,वाढायचा हाकारा केल्यावर,एकच झुंबड उडाली.आधी त्यांनी मला सगळ्या भांड्यांना हात लावायला सांगितले.२ पुर्या,त्यावर भाजी व लाडू असे माझ्या हातात देऊन,नदीत सोडून यायला सांगितले. मी निघाल्यावर एक पोरगा मला गाइड करायला माझ्या बरोबर आला..सोडा ना,जाईल ते पाण्यात;आता नमस्कार करा.....
नमस्कार करून, परत टेबलाकडे आलो,तोवर वाढायला सुरवात झालीच होती.पोरे मला-मला करत होती,धक्का-बुक्की करत होती.मोठी माणसे जरा मागे होती.म्हातार्या बाया एकीकडे,भिंतीशी उभ्या होत्या.साधूंचे कोंडाळेही अधीर झाले होते.सर्वांच्या नजरेत तीच ती आदिम भूक,जी माणसाला पोटासाठी काहीही करायला लावते. बरेवाईट वागायला भाग पाडते; लाज-संकोचही नष्ट करते, ती भूक! गोळाभर अन्नासाठी इतकी अजिजी,हातघाई करणारी ती माणसे बघून माझ्या पोटात कालवलं अगदी! रडू यायला लागलं.डोळे घळाघळा वाहू लागले. इतकं अन्न, इतकी मुलेमाणसे बघूनही खूप अपुरं-अपुरंसं वाटायला लागलं.कोण आम्ही? कितीसं अन्न?कुणाकुणाला पुरे पडणार ते?कशी भागणार भूक?ह्यांचीही स्थिती काही वेगळी नव्हती.आधी आम्ही विचार केला होता की,आपण बनवून आणू व आपल्या हातांनी वाढू,असं. पण आता बघत होतो की, हे असं वाढणं नि इतक्या लोकांना हाताळणं आम्हांला जमलं नसतंच! आमच्याने तर हे बघवलंही जात नव्हतं..आम्ही असाही विचार केला होता की, आपण त्यातलीच पुरीभाजी खाऊन घेऊ,प्रसाद म्हणून..म्हणून बाईंना दुपारी स्वयंपाकाला नको असं सांगितलं होतं;पण, तिथे खाणंही आम्हांला शक्य वाटत नव्हतं.बघता बघता अन्न संपत आलं.माणसंही आटोक्यात आली होती.पोरं हात रिकामे करून,पुन:पुन: मागायला येत होती.४/५ साधू तिथेच घोटाळत होते. मग ह्यांनी हिशेब चुकता केला व आम्ही निघालो.साधू खिडकीजवळ आले; खाना दिया,लेकिन दक्षना किधर मिली?..झालं..ह्यांना उखडायला वेळ लागणार नव्हता. पटकन् पर्समधून ४०/५० रुपये काढून दिले नि निघालो, भरल्या मनाने,वाहत्या डोळ्यांनी आणि रिकाम्या पोटांनी.......
Tuesday, October 9, 2007
Monday, September 24, 2007
प्राण्यांवरचे प्रेम?..
नेहमीप्रमाणे walk साठी दोघे बाहेर पडलो.वळणाशीच आम्हांला बंटीने गाठले.मोठ्या खुशीने अंगावर उड्या-बिड्या मारुन त्याने आपला आनंद व्यक्त केला,नि आमच्याबरोबर walk ला येण्याचे जाहीर केले; नव्हे, आमच्यापुढे चालूही लागला.बंटी, शेजारच्या पाठककाकांचा कुत्रा. आता त्याने पाठककाकांना की काकांनी बंटीला disown केले,माहीत नाही, पण आता तो सगळ्या गल्लीचा कुत्रा आहे. वृत्तीने अतिशय प्रेमळ आहे, पण आल्या-गेल्यांवर चागलाच लक्ष ठेवून असतो.गल्लीत कोणी आलेले खपत नाही त्याला मुळीच! आमच्याबरोबर चालताना,मस्त शानमध्ये चालतो.वाटेत येणार्या लहानमोठ्या कुत्र्यांकडे अजिबात लक्ष देत नाही.कुणाच्या अध्यात-मध्यात नसतो.कुरापतीही काढत नाही. तर, असे आम्ही पाथर्डी फाट्याच्या दिशेने निघालो. साईबाबा मंदिराच्या अलिकडे, पांढरा कुर्ता-पायजमा घातलेले एक साठीचे गृहस्थ समोरून येताना दिसले. उंचे-पुरे,एकदम आडमाप. हातात साखळीने बांधलेला, लुकडासा, बिनशेपटीचा डोबरमन;दुसर्या हातात एक दणकट दांडू.. छडी नव्हे बरं.. दांडू! पूर्वी मी पाहिलं होतं, कुत्रे फिरवणार्यांच्या हातात एखादी छडी नाहीतर फांटी असायची,त्याने कुठे तोंड लावू नये,वा साखळीला ओढ देऊ नये म्हणून; पण इथे तर चांगला दंडा होता, आणि.... आणि काय होतय हे कळायच्या आत, त्या माणसाने कच्कन तो दंडा बंटीच्या पाठीत हाणला.. आईईग्ग.. बंटीबरोबरच मीही कळवळले. खरंतर बंटी अगदी सरळसोट चालत होता; खोडीही काढली नव्हती. त्याला इतक्या जोराने मारायचे काहीच कारण नव्हते. मी तर चांगलीच खवळले.
त्यांना म्हणाले,'वा: वा...हा चांगला न्याय आहे.स्वत:च्या कुत्र्यावर एवढं प्रेम करता,आणि तशाच दुसर्या कुत्र्याला इतक्या जोरात मारूच कसे शकता तुम्ही??काय हा राक्षसीपणा?'
तो;- 'ओ बाई,तो चावला असता ना ह्याला..'
मी;- 'अजिबात चावला नसता.तो सरळ चालत होता..का मारलंत त्याला उगीच?'
तो;- 'ओ..मग सुट्टा कुत्रा घेऊन कशाला फिरता? घरी ठेवा ना...'
मी;- 'मग तुम्हीच ठेवा ना तुमचा कुत्रा घरी, एवढी त्याला चावायची भीती वाटते तर!! कुत्र्याच्या प्रेमाचं एवढं प्रदर्शन करता.. तर हे तुमचं प्रेम झालं का? राक्षस कुठले! काही माणुसकी आहे की नाही?'
मग तो आणि मी..संतापात व्हायची तेवढी सगळी तूतू-मीमी झाली....हेही मग मोठा आवाज काढून माझ्या मदतीला धावले....मग,समोरून येणार्या एका काकांच्या जोडीने,'जाऊ दे हो,नका रागावू इतके'असे आम्हांला चुचकारले.. मग परत आम्ही तिघे पुढे चालू लागलो.संतापाने घामाघूम झालो होतो अगदी;डोळेही भरून आले होते.मनात प्रश्नांचा कल्लोळ ही उठला होता.....
- या म्हातार्याने दाखवलेले हे प्रेम?? हे कसले प्रेम?..
- पाळीव प्राण्याच्या गळ्यात साखळी घालून,त्याला बंधनात ठेवणे,हे प्रेम??..
- जो प्राणी त्या म्हातार्याचा पाळीव प्राणी आहे,तशाच दुसर्या प्राण्याला तो इतक्या जोरात मारू शकतो,हे प्रेम??
- आणि शेवटी, कुणी जर चूक दाखवली, तर त्याला उलट बोलून अपमानित करणे, हे प्रेम??
- कुत्र्यांच्या सारखीच माणसेही पिसाळायला लागली आहेत का हल्ली??.......

Sunday, August 19, 2007
राज कपूर..
लोकसत्ता वाचत होते.निळ्या डोळ्यांचा राजपुत्र अशा शीर्षकाखाली राज कपूरच्या चित्रपटांचा महोत्सव झी सिनेमा साजरा करणार असल्याची बातमी होती.ह्यांना सांगितल,तर म्हणाले, वाच ना सगळं मोठ्याने,....
"त्याच्या निळ्या डोळ्यात कायम स्वप्नं तरळत असायची.कपाळावर आलेले बेफिकीर केस,तोंडात सिगरेट आणि डोळ्यात जादूभरली निळाई घेऊन तो त्याच्या स्टुडिओत तासन्तास काम करायचा.राजस वर्ण,प्रभावी व्यक्तिमत्व, मधाळ हसू आणि अथांग निळे डोळे असलेला हा जादुगार लोकांना स्वप्ननगरीत नेण्यासाठी भव्यदिव्य अस एक विश्व उभारण्यात गढलेला असायचा. मग त्या स्टुडिओतून त्याची स्वप्नं चित्रपटगृहांत झळकायची, ..आणि... आणि लोक हरखून जायचे...
जाने ना नजर,पह..पहचाने..ज..जिगर...द..दम..भर जो उ..उधर म..मु..मुँह फे....फेरे
तेवढयात हे म्हणाले, अगं,अशी काय अडखळते आहेस वाचताना... हो ना, मलाही काही उमजेना......
तर झालं असं की,या ओळी बिना चालीच्या कधी म्हटल्याच नाहीत.. कधी म्हणणंही शक्य नाही.....
जणू या शब्दांत सूर built-in च होते........बघा ना तुम्हीही वाचून!!

Saturday, August 18, 2007
surgery on trigger finger :-2
मला तर काही सुचतच नव्हतं.. काय झालं हे असं!! घसा शिथिल झाला होता, तो Anaesthesia मुळे नव्हता का? तिचं म्हणणं, smoking मुळे narrowing झालं आहे, किंवा स्वरयंत्रावर काही growth झाली आहे... ही emergency आहे ? की accident? की पाटील madam ची mistake ? दोघेही doctors तिला protect करताय्त का? local anaesthesia मध्ये operation करण्याचं ठरल असताना general anaesthesia का द्यावा लागला? मग तो देण्याआधी नळी का नाही घातली? संग्रामला फोन करुन
सर्व परिस्थिती सांगितली......तो दोन्ही doctors शी बोलला....... म्हणाला, आई , आपण हे सगळं त्यांना नाही बोलू शकत.....त्यांनी त्या परिस्थितीत योग्य तेच केलं असणार..
इतकेच सांगतो की, आपल्या नशिबाने बाबांचे फक्त दातांवर निभावले आहे!
त्याच्या आश्वासक शब्दांवर पूर्ण विश्वास टाकला,
आणि निश्चिंतपणे ह्यांची काळजी घ्यायला पुढे सरसावले.......

Friday, August 10, 2007
surgery on trigger finger :-1
सकाळी लवकर आवरुन,सात वाजता hospital ला पोचलो..case paper वगैरे सगळं वेळेत आटपून,sister ने सांगितलेल्या bed वर वाट पहात बसलो.. मग तास भराने, sister बोलवायला आली..चालतच हे तिच्या पाठोपाठ operation theatre मध्ये गेले.. मी बाहेर बाकावर बसून राहिले..पाउण तासाने, दरवाज्यातून stretcher बाहेर आले.. त्यावर हे होते.. बेशुध्द ... तोंडातून रक्त आले होते.. मी अगदी चक्रावले.. local aneasthecia मध्ये surgery करणार होते ना? मग हे बेशुध्द का?.. त्यांना bed वर ठेवले.. तोपर्यंत aneasthetist पाटील आणि Dr पानगवाणेही आलेच.. पाटील madam च्या म्हणण्याप्रमाणे एका पंजाच्या surgery नंतर ह्यांचा श्वास बंद झाला..त्यामुळे त्यांना oxygen देण्यासाठी घशात नळी घालावी लागली..
तर ती श्वासनलिकेत जाईना .. कारण घसा शिथिल आणि बंद झाला होता. life saving action म्हणून त्यांना जबरदस्तीने laringoscope तोंडात घुसवावा लागला.. तो बाहेर काढताना ह्यांचे समोरचे, वरचे दोन दात चक्क उलटे दाबले जाउन,ढिले झाले होते,नि त्यातून रक्त वहात होते......

Sunday, June 3, 2007
टोच..
वर्तमानपत्रांचा ढीग आणि चहा मी टेबलावर ठेवला.. हे काय, दोनच कप? सोनल उठली नाही का अजून? तिचा नंतर ठेवते, भय्या आल्यावर,ताज्या दुधाचा... चहा झाल्यावर तिला बोलवायला गेले तर, अमल जागाच होता.. तितक्यात सेलची रिग वाजली.मिनलचाच असणार! तिला चहा झाल्याची खूण करून, अमलला घेउन बाहेर आले. म्हंटलं.त्याचं औषधपाणी करून घेऊ या.. मग त्याला भूक लागेल, झोपही येईल.. एकीकडे सोनलसाठी कणेरी शिजत ठेवली; काल किती जोरदार पोटात दुखलं रात्री.. जरा हलकंच बरं!....सगळं झालं, तरी त्यांचं बोलणं सुरूच होत.... मलाच पोटात कासावीस झालं.. भूक लागली असेल पोरीला! चागलं गरम चहाबरोबर काही खाऊन घेतलं असतंन् तर!! आता लगेच मावशीही येतील, आंघोळ घालायला..... याच घालमेलीत तीन-चारदा आतबाहेर झालं.. माझी अस्वस्थता तिच्याही लक्षात आलीच.. तरी बोलणं चालूच! शेवटी अमल झोपून गेला.. त्याला पाळण्यात ठेवण्यासाठी आत गेले, म्हंटलं, बघ, झोपून गेला तो, कंटाळून.... मग, बोलणं आवरतं घेऊन, वैतागून, ती करवादली, 'मग, काय म्हणायचंय तुला? मिनलशी बोलणं, ही काय चूक झाली का माझी?' आता काय सांगणार हिला? तिची नाही, पण त्याने फोन करताना विचारायला नको होतं का की, तिचं चहापाणी झालंय, की नाही? एवढा प्रेमाचा होता तर, त्याने तिला आधीच सांगायचं की, मी तासभर बोलणारेय; तुझं काय ते चहा-खाणं सगळं समोर घेऊन बस म्हणून! ही अशी situation काही आजच पहिल्यांदा आलेली नाही.. कित्तीवेळा झालंय असं! यांचं फोनवरचं बोलणं संपतच नाही.... मग बसली टेबलाशी, तो गारढोण चहा घेऊन!!
म्हणजे, हिची भूक कळून मला टोचलं.. त्याला तिची भूक कळली नाही, म्हणूनही मला टोचलं....
आणि, मला टोचलेलं तिला कळलंच नाही, म्हणूनही मलाच टोचल...काय रे दैवा !!

Thursday, May 31, 2007
क्षणात...
काल रात्री बाईंची सुटी होती.उराउर पण बरीच होती.काही वेगळं खावंसं वाटत होतं,पण खूप कामही करायचं नव्हतं..काल सकाळी अमलचं vaccination झाल होतं; त्याने दिवसभर उभं धरलं होतन्.. मग Mania करायचं ठरलं. म्हणजे लवकर खाणी उरकली असती, नि झटपट आवरलंही असतं; पण ते कुठून व्हायला? खाणी होताहोताच अमल उठला.त्याचं पिणं होईपर्यंतच मिनलचा फोन आला, नि काहीतरी चिडचिड झाली.मग अमलला खांदयावर घेऊन झोपवलं, नि पाळण्यात ठेवलं.तोवर,सोनलच्या पोटात जोरदार दुखायला लागलं.Gases असतीलसं वाटलं,म्हणून सुंठ,हिंगपूड तुपातून,गरम पाण्याबरोबर दिलं.पण तितकासा relief वाटेना.मग पोटालाही हिंग लावला.जरा वेळ बरं वाटलं,पण पुन्हां उफाळुन आल्यागत खूप दुखायला लागलं..सारखी उठत होती,बसत होती; आतून चैन नव्हतं..मला काही सुचेना, घरात काही औषध असल्याचंही आठवेना (खरंतर,कित्ती वर्षांत कुणाचं पोट बिघडलंच नव्हतं) बारा वाजत आले होते. मग संग्रामला फोन केला.त्याने सगळी विचारपूस करून दोन गोळयांची नावे सांगितली.पटकन् ह्याना आणायला पाठवलं..पुढचा विचारही सुरू झाला की, अर्ध्या तासात नाही कमी झालं, तर Lifeline Hospital ला जायचं.. पण बरं,ती वेळ नाही आली!! गोळी घेताच पाचव्या मिनिटाला घोरायला लागली सोनल!!
मी अगदी चकितच झाले..आतापर्यंत नेहमी मी नि संग्राम वाद घालत आलोय..मी आयुर्वेदिक औषधे नि निसर्गोपचार यांच्या बाजूने, आणि तो Allopathy च्या..तो सांगत आलाय की Allopathy मध्ये जसे Magic Drugs आहेत, तसे आयुर्वेदात नाहीयेत. मी कधीच मान्य करत नसे, पण आज मात्र.... मान गये उस्ताद !!

Saturday, May 5, 2007
क्षणात....
आज बारीकसारीक खरेदीची यादी केली..मुद्दामच ह्यांना बरोबर घेऊन बाहेर पडले..एकतर मेनरोडवर एकटीने जायला कंटाळा येतो..आणि दुसरे म्हणजे, ह्यांच्याशी जरा गप्पाही मारता येतात..आजकाल गावात गेल्यावर parking चा फारच problem येतो, हयांना चिडचिड करायला एक सार्वकालिक निमित्त! हो, पण आज मात्र जागा लगेच मिळाली. एक धोतर घ्यायचं होतं यायांसाठी, आणि भाऊसाहेबांसाठी कुरता, शिवाय थोडी औषधेही...आधी पोद्दार store मध्ये गेलो. इथे बरीच नोकरमाणसे कामाशिवाय उभी असतात..
कुरता हवाय म्हंटल्यावर तीन माणसे एकावेळी विचारायला लागली.काय,कसा, कुणासाठी,लखनवी का?..ह्यांना त्रास व्हायला सुरवात झाली.मग मी म्हंटलं,अहो, दाखवा तरी आधी! मग एक खोका पुढे आला..त्यांना chinese collar.....हे म्हणाले, अशी नको,साधा गळा....ते म्हणे, तसा नाही येत...
अरे,नाही कसा? मी आधी घेतल्येत ना तसे!..तरी ते म्हणे,नाही येत तसे..हे भडकले..अरे,येत नाही,असं नका सांगू, तुमच्याकडे नाहीयेत,असं म्हणा.....मग झाला वाद सुरू!
म्हंटलं,चला हो,जाऊ द्या,काय या बावळट लोकांच्या तोंडी लागता.त्यांना काही training नसतं.....
मग मलाच customer satisfaction वर एक भाषण ऐकावं लागलं (पाठच होतं मला ते)
शेजारच्या दुकानातही कुरता नव्हताच..मग श्रीराम मेडिकलमध्ये गेलो.तिथे कुलकर्णींशी बोलून,हसून मूड छान सुधारला. धोतरही मनासारखं मिळालं.भराभर चालत गाडीकडे निघालो.रस पिऊन जरा आणखी ताजेतवाने झालो,नि मजेत गप्पा मारत घरी आलो.
मिनूचं जेवण झालं होतं, आई मात्र थांबली होती..
जेवणही अगदीच flat होतं म्हणे..............
TVही अगदीच नीरस बातम्या देत होता....encounter,गुजराथ सरकारचं धोरण,CBI...
मग चिडून त्याच्यावर तोंडसुख घेऊन झालं..मी नि आई गप्पच!!..
शेवटी कंटाळून तेही गप्प झाले..हात धुऊन वरती गेले......
मग माझं आवरल्यावर वर गेले..जरा जवळ घेऊन थोपटल्यावर स्वारी शांत..क्षणात झोपही लागली..
काय बाई हा स्वभाव.. .... !!
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात पिवळे ऊन पडे!!

Friday, May 4, 2007
मारवा...
परवा रात्रीच्या गडबडीत सारेगमप नीटसं बघताच आल नाही..पण सुधीर मोघेंनी गायलेलं गीत मात्र मनात अगदी ठसलं..स्वामी मालिकेत त्यांनी ते background ला वापरलं होतं..सगळं गीत काही लक्षात राहिलं नाही, .. पण मारवा रागातली सुरावट काही केल्या डोक्यातून जाइना.. आणि त्या दोन ओळी तर लगेचच संपून जायच्या....मग जरा चार ओळी रचल्या, आणि गुणगुणत राहिले.....
तुझे मन माझे झाले,माझे मन तुझे झाले..
तुझा प्राण माझा प्राण,उरले ना वेगळाले..
काटा तुझ्या पावलात,आसू माझ्या ग डोळ्यात..
सल तुझ्या काळजात,मन माझं खंतावतं..
तुझ्या हासण्याची रेष,माझ्या जीवनी प्रकाश..
तुझ्या मनात बकूळ,माझ्या मनीं दरवळ.....
दोन दिवस तेच गाणं..तेच वेड..सकाळी चहा करतानाही तेच सूर..शेवटी मिनू वरून ओरडली, काय गं !!सकाळी सकाळी मारवा आळवतेयस?? जरा दुसरं काही गा बघू.........

Tuesday, May 1, 2007
युध्दाचा प्रसंग..
रविवार सकाळपासून मौनातच गेला..आई,हे आणि मिनल यांची जेवणे आधी केली,नि मग मी आणि मिनू बसलो.. आम्ही जेवत असतानाच, हे खाली आले..हातात माझी छोटी jeans ची शबनम होती.....मला म्हणाले,जाउन येतो जरा..
आता,कुठे ते कसं विचारायचं?.भर उन्हाची वेळ! एकदा वाटलं,मसाजला गेले असतील,पण इतकं जेवल्याजेवल्या? आणि विचारल्यावर आणखीन् तडकले म्हणजे?.....ok म्हंटलं,आणि मुकाट्याने जेवत राहिले.......
सोनलचं झाल्यावर मात्र पटकन् ओटा आवरला, आणि त्यांना फोन केला. कुठे आहेत ते विचारायला....
गंगेवर आहे असे म्हणाले.पटकन् गाडी घेउन घाटावर निघाले.....club ची membership असताना,यांना घाटाच्या घाणेरड्या पाण्यात कशाला जायला हवंय? पण हे बोलायचं कुणी?
सगळा घाट पालथा घातला,पण हे कुठे दिसेनात..खरंच इथे आलोय असंच सांगितलं ना? मला काही सुचेना..
परत त्यांना फोन केला, तर परत निघालोय, म्हणाले............काय रे देवा!! त्यांना थांबायला सांगितलं आणि परत निघाले..
मुंबई नाक्याच्या अलिकडे, रस्त्याकडेला ते थांबले होते..त्यांच्या गाडीजवळ गाडी पार्क करुन,त्यांच्या गाडीत जाउन, जरा वेळ बोलत बसले..समजूत काढली..म्हंटलं,का असं वागता? माझी किती ओढाताण होतेय, बघता ना?
ok, चल म्हणाले..मग घरी आलो.....ते वर आपल्या खोलीत, नि मी आईजवळ, झोपून गेलो... ..
आईने विचारलेच, कुठे गेली होतीस ग? ....म्हंटलं, काही नाही ग,.......जरा शुभाकडे जाउन आले....................

Monday, April 30, 2007
युध्दाचा प्रसंग
काय हल्ली चाललंय, देव जाणे,माझ्या patience ची अगदी कसोटी आहे.delivery नंतर सोनल फार sensitive आणि possesive झाली आहे.परवा हे tight होउन आलेलंही तिला मुळीच आवडलेलं नाही..तेव्हाही ती जरा upset झाली होती..शनिवारी संध्याकाळभर पिल्लू फार कुरकुर करत होतं..त्याच्या रडण्यानेही ती बेजार झालेली होती......हे बाळाला घेऊन फिरवत होते..
तिने बोलावलं,म्हणून ते त्याला वर तिच्या खोलीत घेऊन गेले..पाठोपाठ मी ही गेले..त्यांच्यात नक्की काय संभाषण झालं, माहीत नाही,पण ती चिडून त्यांना काही बोलली, हे मी ओझरतं ऐकलं.त्यांचा चेहरा एकदम पडला..........
मी चटकन् बाळाला त्यांच्याकडून घेतलं,आणि त्यांच्या पाठीवर थोपटून cool म्हंटलं..बाळाला फीड करायचं होतं..मी जरा गप्पच होते......
ते आटपल्यावर मी खाली आले..सर्वाना भूक लागली होती,म्हणून म्हंटलं, आहेत त्यांची जेवणे करून घ्यावीत.....
आई,मिनल आणि हे यांची पानं घेतली..हे भडकलेले होते,अपमानित ही होते.....त्यांची बडबड सुरु झाली.....
आई गप्प,मिनल रडवेला......हे काही केल्या थांबेनात..मलाही काही सुचेना.......
तिला ऐकू गेल्यावर तिनेही ओरडाआरडा केलान्..मिनललाही ती आवरेना..
कसंबसं सगळ्यांना चुचकारून झोपायला पाठवलं........रात्र कशी ती संपेना.!!
रविवार असाच मौनात गेला..ती लहान म्हणून,ते मोठे म्हणून..कोणी माघार घ्यायला तयार नाही..
आज सकाळी मिनल बेलापूरला गेला..ती जरा शांत झालीय, पण हे तसेच, अस्वस्थ.....मगाशी तिने त्यांना sorry म्हंटलंय..
आता बघू,हे कधी निवळतायत !! तोपर्यंत माझ्या डोक्याचा भुगा..!!

Friday, April 27, 2007
युध्दाचा प्रसंग..
सकाळी जाऊन उठवलं,तर चेहरा एकदम ताजातवाना होता...झोप लागली होती तर चांगली !
चहा-नाश्त्यानंतर स्वारी तयार होऊनच खाली आली..अरे हो,चंद्रकांतच्या मुलीच्या लग्नाला जायचं होतं नाही का!
पण सोनल एकदम नाराज झाली..आई,बाळाचे कान टोचायचेत ना गं!..
म्हटलं,हो बेटा,मी आहे ना !! (मी आहेच हातचा एक! )
सिन्नरला निघाले होते,चंद्रकांत वरंदळ कडे..खरं तर त्या लोकांच्यात गेले की मला काळजीच वाटत राहते..
एकूण,त्या राजकारणी लोकांची नावड आणि भीतीच आहे मला!!
त्यांच्यात बसून गप्पा,पिणं झालं की,नको-नको होतं...
साडेसातला घरी आले..एकदम टेट!!
शी....celebration लाही दारु प्यायची,मर्तिकालाही,आणि बिदाईलाही!!!!
तर,गाडी नीटपणे आणली घरी.... ....कसेबसे गाडीतून उतरले...
घरात आई होती,कसं वाटलं असतं तिला...मग त्यांना बाहेरच गाठलं..
म्हंटलं,अहो,जास्त घेतलीत? आता सरळ वरती जा हं...मी येते खोलीत,मग बोलू......
बाईंचा स्वयंपाक सुरु होता..आई टीव्ही बघत होती...सोनल तिच्या खोलीत......
मग सरळ वर गेले...महाराजांना गच्चीत घेऊन गेले..खुर्च्या टाकून बसलो..थंडगार पाणी दिलं..
चेहर्यावर दिसतच होतं,मनात विचारांचा कल्लोळ चालू होता..
हं.कोण कोण भेटलं तिथे?
उत्तर देण्याऐवजी त्यांना रडूच फुटलं..हेही नेहमीचंच !
सुषा,तुझ्याशिवाय कोणीच नाहिये मला,जगात !!
म्हंटलं, हो, पण काय काय झालं तिथे? लग्न कसं झालं?
ठीक झालं सगळं..पण सुषा, कंपनीची वाट लागतेय! तिथे काय चाललंय,कोणालाच माहीत नाहीये...
worker पासून ex.director पर्यंत जे सगळे भेटले,कुणालाच काहीच माहीत नाही..सगळेच पडचाकर!!
सगळे नुसते पगारापुरते तिथे!
जाउ दया ना हो, का सारखा त्रास करुन घेता?.विसरा सगळं!..
पण नाहीच.हुंदके थांबतच नव्हते..मग रडू दिलं जरा वेळ..त्याने हलकं झालं जरा..
मग आत आणलं..म्हंटलं,पडा जरासं, सावकाश मग जेवण आणते..
खाली आले तर बाई गेल्या होत्या..आई वाटच पहात होती...
तिला जरा जुजबी सांगितलं,तेवढ्यात,पुन्हा ह्यानी हाक मारली..
धावतपळत वर गेले तर म्हणाले, भूक लागलीय....
मग सारं जेवण वर नेलं,नि जेवू घातलं....
कारण,शिरीषही यायचा होता जेवायला, आई होती..कसे वागले असते,कोण जाणे!!
हे सगळं करण्यात अर्धापाउण तास माझी जी काही धावपळ नि घालमेल चालली होती,तिला काही सुमारच नव्हता..
मग शिरीष आला.....मुकाट्यानेच जेवणे उरकली.....
कसा रात्रंदिन युध्दाचा प्रसंग येतो ना..आणि वेळेला साजरा अभिनयही करावा लागतो ना!!!

Thursday, April 26, 2007
सबुरी
काल रात्री पिल्लू झोपतच नव्हतं, काही केल्या!! दोन वाजून गेले होते ,
मिनूही अगदी थकून गेली होती.....शेवटी एकदा दोघेही झोपले..
मीही अंथरुणाला पाठ टेकणार,तोच फोनची रिंग वाजली..
मिनूने घेतला..आई,बाबांचा फोन..
मी घेतला,अहो,काय झालं?..
सुषा,मला झोप येत नाहीये..
घाईघाईत आमच्या खोलीत गेले..म्हंटलं,काय होतंय हो?
त्यांना झोपच लागत नव्हती..मग गोळी दिली,पाणी दिलं.
.म्हटलं,जरा कुरवाळुन,थोपटून,मग जावं झोपायला..
सुषा,प्लीज,पाठीवरुन हात फिरव ना!...एकदम आज्ञा सुटली...
हुं!! म्हणजे आता मी जे करणार,ते ह्यांच्या आज्ञेने..
मला करायचे,म्हणून नाही!!
आता त्या करण्यातली मजाच गेली...
का हे इतक्या घाईने सांगतात? का मुळीच वाट पहात नाहीत?
खाली साईबाबांना मनापासून धूपदीप करतात ना?
मग त्याना सबुरी, patience चा अर्थ का कळत नाही?
धीर धरणे का जमत नाही?
मग जरा वेळाने झोपायला गेले.......

Saturday, March 31, 2007
उजाडलं.......
कान्हाला goodnight करुन झोपायला आले खरी,पण झोपेचा पत्ताच नव्हता.मग जरा वेळ नेटवर भटकून,काहीबाही वाचून झालं. पत्ते खेळून झाले,तरीही झोप गायब! मग गच्चीत गेले.जरा तरातरा चालले.मग खुर्ची टाकून शांत बसून राहिले.
खाली गेटशी वाचमनकाका,नि वर मी....दोघेही ह्यांचीच वाट पहात....
आज नवनाथ आणि मराठे बरोबर डिनरला गेले होते. आणखीन कुणी तिसरा होता हे रात्रीच्या बरळण्यातून समजलं.
आज प्रथमच,कुणाबरोबर आणि कुठे हे दोन्ही मला माहीत नव्हतं..
आजकाल,factory मधून वा factory-related कुणी येणं,म्हणजे मला संकट वाटतं, कारण त्या भेटीनंतर,त्यांचा नि पर्यायाने घराचाच मूड बिघडतो.
मला चाहूलच लागते जशी..
रिटायर होउन पाच महिने झाले.त्याआधी वर्षभर ते रिटायरमेंटचीच तर वाट बघत होते.तेव्हां सोडायची चा धोशा घेऊन, मला पुढच्या सहजीवनाची स्वप्ने दाखवणारे ते,आजसुध्दा तसेच अस्वस्थ,अस्थिर आहेत.आणि विनाकारण माझ्या मनाचा डोहही ढवळून काढीत आहेत.....
........ते अडखळत आत आले....anyway ,गाडी मात्र नीट चालवतात,नेहमीच..(तशी कधी ठोकलीही आहे)
तरीही मी सवयीने विचरलं,नीट आणलीत ना गाडी?.....
क्या यार,गाडीची जास्त काळजी,माझ्यापेक्षा !!
फारसं मनावर न घेता त्यांच्यापाठोपाठ वर निघाले...
सुषा,प्लीज,काहीतरी soothing हवं आहे... ... (हं,मला येताना पाह्यलंच नव्हत्त त्यांनी)
वर गेल्यागेल्या धाडकन् बेडवर आडवे...चपला काढून घेतल्या.कपडे बदलून,थंड पाणी दिलं...मग,
........सुषा,आज मला कळलं..ज्ञानेश्वराला जे त्याच्या वयाच्या २१ व्या वर्षी कळलं,ते मला,आज ५८ व्या वर्षी समजतंय.त्याने समाधी घेतली,तेच बरोबर केलं.Samadhi is the right solution........
.म्हटलं,काय समजलंय तुम्हाला?...............
......सुषा,ज्ञानेश्वराचं ज्ञान,तत्वज्ञान,शहाणपण,त्याच्या values या कशाकश्शाला समाजात तेव्हां जागाच नव्हती. ज्ञानेश्वराला,नि त्याच्या भावंडानाही नव्हती.....म्हणून तर लहान वयातच संपले सारे...सारेजण !!
...म्हंटलं,नाही कसं? ज्ञानेश्वरीचा अभ्यास तर जगात सगळीकडे होतोय..त्याच्या values आजही टिकून आहेत.. ....
अगं पण,ज्ञानेश्वर कुठे राहिला? त्या पोराला तर,जगणं हराम करून टाकलं,त्या संस्कृतीरक्षकांनी..socalled ब्राह्मण पंडितांनी...... yes, त्याने समाधी घेतली,हेच बरोबर केलं......आजही,चागला माणूस,त्याचं चांगलं वागणं,चांगलं बोलणं,चांगले हेतू,त्याच्या values , काही नकोच आहे समाजाला ....ज्यांना त्या values समजत नाहीत,चांगुलपण नको आहे,अशी माणसे मस्त मजा करतात.आणि चांगली माणसं समाधी घेतात,संपून जातात..............
जाऊ दे ना सुधा...मला सांग,मराठेने घेतली का?
हँ..तो कुठे घेतो?
(हो ना,अगदी उमदा,निर्व्यसनी तरुण आहे तो !!)
....नवनाथ?........हो म्हटलं की नाही,ते काही कळलं नाही..........
म्हटलं,मग काय,तुम्ही एकटेच पीत बसलात??.....नाही अगं..तो.........
ohh , तेव्हां समजलं की आणखी कुणी होता..कोण होता,का होता?..माहीत नाही..
आतापर्यंत सांगत आल्येत...पुढचं काही माहीत नाही............
सुषा,माझं प्रयोजन संपलंय या जगातलं......माझे सद्हेतु,माझ्या values, सगळं,मी माझ्याच हातांनी गाडून टाकणार आहे,नि मग मीही............
म्हटलं,जाऊ दे ना रे सुधा..तू झोप बघू शांत....
मग,त्याच्या डोळ्यांवर,कपाळावर जरा हात फिरवला,पांघरुण घातलं,
तर माझा हात घट्ट धरूनठेवलान्....... सुषा,खरंच कंटाळलोय गं मी...........
हा कंटाळा शब्द ऐकून,मला खरंतर चांगलाच राग आला...होतंय काय याला असं कंटाळायला? एवढं कसलं frustration? कसला राग?..ठीक आहे,factory साठी कष्ट उपसले,जीव ओतला...पण,आता काय त्याचं?? आप मरें,जग डूबें.......कंपनीने मानमरातब,पैसा ही खूप दिला,यश दिलं...
आता तिच्यापासून dettach व्हायला नको का?आज कंपनीची घसरण चालू आहे.मालकाकडे पैसा आहे,पण capacity च्या ५० टक्केही उत्पादन नाही .caterpillar ची पूर्ण order हातातून गेली, जी मिळवण्यासाठी तू एक वर्ष अमाप धडपड केली होतीस.....हातात orders च कमी आहेत.. साधं scrap साडेतीनशे टनांवरुन शंभर टनांच्या आत आलं....
जाउ दे ना..आता गेली ती Raymonds च्या घशात...!! नाही वाचवू शकलास ना? २५ कोटी नाही उभे करु शकलास ना?..कारणे काहीही असोत....तुझेच इतक्या वर्षांचे सहकारी जर guarantee देत नव्हते,तुझ्यावर शंभर टक्के विश्वास टाकत नव्हते....तर,एकटा तू काय करणार होतास?....
.......हे माझे नेहमीचे प्रश्नही,आणि त्यांची उत्तरेही तुला ठाऊक आहेत ना?....
मुकाट्याने खाली येऊन झोपले..याच वादळात सकाळ झाली...त्यांना उठवलंच नाही.......
पण,चहाचा वास नाकात शिरताच स्वारी लगेच उठून,खाली आली,
आणि मग एकदमच उजाडलं........नेहमीसारखं.........!!

Subscribe to:
Posts (Atom)