सकाळी जाऊन उठवलं,तर चेहरा एकदम ताजातवाना होता...झोप लागली होती तर चांगली !
चहा-नाश्त्यानंतर स्वारी तयार होऊनच खाली आली..अरे हो,चंद्रकांतच्या मुलीच्या लग्नाला जायचं होतं नाही का!
पण सोनल एकदम नाराज झाली..आई,बाळाचे कान टोचायचेत ना गं!..
म्हटलं,हो बेटा,मी आहे ना !! (मी आहेच हातचा एक! )
सिन्नरला निघाले होते,चंद्रकांत वरंदळ कडे..खरं तर त्या लोकांच्यात गेले की मला काळजीच वाटत राहते..
एकूण,त्या राजकारणी लोकांची नावड आणि भीतीच आहे मला!!
त्यांच्यात बसून गप्पा,पिणं झालं की,नको-नको होतं...
साडेसातला घरी आले..एकदम टेट!!
शी....celebration लाही दारु प्यायची,मर्तिकालाही,आणि बिदाईलाही!!!!
तर,गाडी नीटपणे आणली घरी.... ....कसेबसे गाडीतून उतरले...
घरात आई होती,कसं वाटलं असतं तिला...मग त्यांना बाहेरच गाठलं..
म्हंटलं,अहो,जास्त घेतलीत? आता सरळ वरती जा हं...मी येते खोलीत,मग बोलू......
बाईंचा स्वयंपाक सुरु होता..आई टीव्ही बघत होती...सोनल तिच्या खोलीत......
मग सरळ वर गेले...महाराजांना गच्चीत घेऊन गेले..खुर्च्या टाकून बसलो..थंडगार पाणी दिलं..
चेहर्यावर दिसतच होतं,मनात विचारांचा कल्लोळ चालू होता..
हं.कोण कोण भेटलं तिथे?
उत्तर देण्याऐवजी त्यांना रडूच फुटलं..हेही नेहमीचंच !
सुषा,तुझ्याशिवाय कोणीच नाहिये मला,जगात !!
म्हंटलं, हो, पण काय काय झालं तिथे? लग्न कसं झालं?
ठीक झालं सगळं..पण सुषा, कंपनीची वाट लागतेय! तिथे काय चाललंय,कोणालाच माहीत नाहीये...
worker पासून ex.director पर्यंत जे सगळे भेटले,कुणालाच काहीच माहीत नाही..सगळेच पडचाकर!!
सगळे नुसते पगारापुरते तिथे!
जाउ दया ना हो, का सारखा त्रास करुन घेता?.विसरा सगळं!..
पण नाहीच.हुंदके थांबतच नव्हते..मग रडू दिलं जरा वेळ..त्याने हलकं झालं जरा..
मग आत आणलं..म्हंटलं,पडा जरासं, सावकाश मग जेवण आणते..
खाली आले तर बाई गेल्या होत्या..आई वाटच पहात होती...
तिला जरा जुजबी सांगितलं,तेवढ्यात,पुन्हा ह्यानी हाक मारली..
धावतपळत वर गेले तर म्हणाले, भूक लागलीय....
मग सारं जेवण वर नेलं,नि जेवू घातलं....
कारण,शिरीषही यायचा होता जेवायला, आई होती..कसे वागले असते,कोण जाणे!!
हे सगळं करण्यात अर्धापाउण तास माझी जी काही धावपळ नि घालमेल चालली होती,तिला काही सुमारच नव्हता..
मग शिरीष आला.....मुकाट्यानेच जेवणे उरकली.....
कसा रात्रंदिन युध्दाचा प्रसंग येतो ना..आणि वेळेला साजरा अभिनयही करावा लागतो ना!!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment